चोपडा वनविभागात कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

0
13

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

यावल वनविभाग आणि चोपडा सबडिव्हीजन अंतर्गत वनपरिक्षेत्र चोपडा, वैजापूर, अडावद व देवझिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सातपुड्यातील वने, वन्यजीव संरक्षण व देखभाल करणाऱ्या क्षेत्रीय वनाधिकारी, कर्मचारी व कार्यालयीन कर्मचारी यांची वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर चोपडा वनपरिक्षेत्र कार्यालय येथे नुकतेच पार पडले. हे शिबीर वनसंरक्षक ऋषीकेश रंजन, उपवनसंरक्षक ए. आर. प्रवीणमार, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांच्या मार्गदर्शनाखाली व यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नाने घेण्यात आले.

याप्रसंगी घाटकोपर, मुंबई येथील स्पार्कस लाईफ केअर संस्थेतर्फे वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक, लेखापाल, लिपीक व वनमजूर आदी अधिकारी व कर्मचारी यांचे शुगर, बीपी, रक्त तपासणी, हृदयरोग, किडनी, वात, पित्त अशा विविध आजाराची तपासणी करुन औषधोपचार, वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन देण्यात आला. शिबिरात डॉ. सुनील बारगे, डॉ. मधुकर आव्हाड, डॉ. विश्वास पवार, डॉ. कल्पेश सोले, डॉ. वैशाली गवाले, डॉ. मदन पिसे, डॉ. नईमुद्दीन मलिक, एस. के राकेश आदींनी तपासणीसह मार्गदर्शन केले.

शिबिरास चोपडा वनपरिक्षेत्र अधिकारी बी. के. थोरात, देवझिरी वनपरिक्षेत्र अधिकारी बडगुजर, वैजापूर वनपरिक्षेत्र अधिकारी समाधान सोनवणे, अडावद वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद पाटील आदींची उपस्थिती होती. शिबिराचे आयोजन चोपडा वनपरिक्षेत्र अधिकारी बी. के. थोरात यांनी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here