नागलवाडी माध्यमिक विद्यालयातील मुलींना १८ सायकलींचे मोफत वाटप
साईमत/चोपडा/प्रतिनिधी
मानव विकास संसाधन अंतर्गत आठवीच्या मुलींना घरून शाळेत ये-जा करण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी चोपडा एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या सचिव माधुरी मयूर, संचालक भूपेंद्रभाई गुजराथी, ज्येष्ठ सभासद रमेश जैन, नागलवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन पाटील, महिला सदस्या लिलाबाई पाटील, ढिंगलीबाई बारेला,
ग्रामपंचायत सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिक माजी सरपंच धरमदास आण्णा, महाराणा पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र पाटील, वि. का. सोसायटीचे व्हा.चेअरमन दीपक पाटील, नागलवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख देवेंद्र पाटील, संस्थेचे समन्वयक गोविंदभाई गुजराथी, उल्हासभाई गुजराथी, डी.टी महाजन, प्रताप विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालय नागलवाडी शाळेचे आजी-माजी मुख्याध्यापक, उप मुख्याध्यापक, सर्व पर्यवेक्षक, संस्थेच्या इतर शाखांचे अधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावातील ग्रामस्थ, पालक उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या सचिव माधुरी मयूर यांनी मनोगत व्यक्त केले. शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांंच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला. प्रास्ताविक मुख्याध्यापक आर.बी.पाटील, सूत्रसंचालन दीपक राजपूत तर आभार नवनीत राजपूत यांनी मानले.