जामनेरला आयपीएकडून कुपोषित बालकांची मोफत तपासणी

0
105

साईमत/ न्यूज नेटवर्क । जामनेर ।

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार जामनेर तालुक्यातील राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत धडक अंगणवाडी तपासणी मोहिमेंतर्गत तपासणी झालेल्या बालकांमधून कुपोषित बालकांसाठी जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे विशेष तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आरोग्याची देवता धन्वंतरी पुजनाने करण्यात आले.

शिबिराचे आयोजन आरोग्य विभाग, महिला बालकल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने केले होते. इंडियन पेड्रीयाट्रिक असोसिएशनचे शिबिरास सहकार्य लाभले. त्यात डॉ.अमोल शेठ, डॉ.सतीश चौधरी, डॉ.संदीप पाटील, डॉ.प्रशांत महाजन, डॉ.राहुल निकम या बालरोग तज्ज्ञांमार्फत कुपोषित बालकांची मोफत आरोग्य तपासणी केली. त्यात २८३ जणांच्या तपासणीतून ३४ बालकांना जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करण्यात आले. समता फाउंडेशनमार्फत अतिरिक्त औषध पुरवठा करण्यात आला.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय सोनवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी राऊत, डॉ.नरेश पाटील, डॉ.दानिश खान, डॉ.प्रशांत महाजन, डॉ.चंद्रमणी सुरवाडे, डॉ.जितेंद्र वानखेडे, डॉ.धनंजय पाटील, डॉ.अनिता राठोड, डॉ.विजया पाटील, डॉ.स्वाती विसपुते, डॉ.निलेश चव्हाण, बालविकास प्रकल्प अधिकारी शीला पाटील, संघमित्रा सोनार अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, राष्ट्रीय बाल स्वास्थ टीमचे सर्व सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here