Fraud of 36 Lakh 39 Thousand : जळगावातील व्यापाऱ्याची ३६ लाख ३९ हजारांची फसवणूक

0
22

एमआयडीसी पोलिसात ४ व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, दोघांना अटक

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  

एमआयडीसी परिसरातील डाळींचे व्यापारी तथा ‘सक्षम उद्योग’चे मालक विनोदकुमार चंचलचंद जैन (वय ४१) यांची सुमारे ३६ लाख ३९ हजार ६५० रुपयांमध्ये फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात बालाजी ट्रेण्डिंगचे दलाल सूरजकांत ऊर्फ राज संजय व्यास, किशोर ट्रेडर्सचे प्रोप्रायटर किशोर मिठालाल पुरोहित, आयुष ट्रेडर्सचे प्रोप्रायटर दीपक राजेश व्यास आणि विष्णुकांत लक्ष्मी नारायण पुरोहित ट्रेडर्सचे प्रोप्रायटर श्रीकांत पुरोहित यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, त्यातील दोघांना अटक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सविस्तर असे की, विनोदकुमार जैन हे डाळींचे (दाल) व्यापारी आहेत. सूरजकांत व्यास हा त्यांच्यामार्फत दलालीचा व्यवसाय करत होता. सूरजकांतने जैन यांचा विश्वास संपादन करून मालाचे पैसे तात्काळ देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर जैन यांनी संशयित आरोपींना मूग डाळ (कच्चा माल) पुरविला. मात्र, चौघांनी परस्पर संगनमत करून, परस्पर मालाची विक्री केली आणि त्याचे पैसे जैन यांना परत दिले नाहीत. जेव्हा जैन यांनी आपल्या पैशांची मागणी केली, तेव्हा चौघांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली.

चौघांकडून विनोदकुमार जैन यांना पैसे न देण्याची धमकी

“आम्ही तुला पैसे देणार नाही, तुझ्याकडून जे होईल ते करून घे, आम्ही कोणाला घाबरत नाही, पुन्हा आमच्याकडे पैसे मागितले तर तुला सोडणार नाही” अशी धमकीही दिली. त्यानंतर जैन यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरुध्द तक्रार दाखल केली. विनोदकुमार जैन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सूरजकांत ऊर्फ राज संजय व्यास, किशोर पुरोहित, दीपक व्यास आणि श्रीकांत पुरोहित यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here