बकऱ्या चोरी प्रकरणी चार जणांना अटक

0
62

रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

साईमत/रावेर/प्रतिनिधी :

तालुक्यातील कुसुंबा येथील पाझर तलावानजिक झालेल्या बकऱ्या चोरीचा शोध पोलीस लावला आहे. याप्रकरणी कुसुंबा येथील चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सतरा हजार रुपये किमतीच्या बकऱ्या हस्तगत केल्या आहेत. मुंजलवाडी येथील मेंढपाळ गोपाल अर्जुन पिसाळ हे त्यांच्या मालकीच्या बकऱ्या कुसुंबा बु. गावी पाझर तलावाजवळ जंगलात चारत असतांना तीन बकऱ्या कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याने रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांनी गुन्हे शोध पथकाला निर्देश दिले. पोलीस पथक मुंजलवाडी, कुसुंबा, लालमाती रसलपूर, अभोडा परिसरात पथक अज्ञात आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान, गुप्त माहिती मिळाल्याने शोध पथकाने तालुक्यातील कुसुंबा खुर्द येथे धाव घेतली. तनविर रफिक तडवी (वय १९), शरीफ जहाबाज तडवी (वय २५), कलीम हमीद तडवी (वय ३३), अजरुद्दीन महमुद तडवी (वय २०, सर्व रा. कुसुंबा खु. ता.रावेर) यांना ताब्यात घेवून पथकाने त्यांना रावेर पोलीस स्टेशन येथे आणले. आरोपीतांना विश्वासात घेवून त्यांची विचारपूस केल्यावर त्यांनी तीन बकऱ्या चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून १७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पथकाने केली कारवाई

ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पो.हे.काॅ.रवींद्र वंजारी, पो.काॅ. सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. सिकंदर तडवी करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here