Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»क्विक हेल फाउंडेशनतर्फे विद्यापीठाला चार सायबर सुरक्षा पुरस्कार
    जळगाव

    क्विक हेल फाउंडेशनतर्फे विद्यापीठाला चार सायबर सुरक्षा पुरस्कार

    SaimatBy SaimatFebruary 14, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    क्विक हेल फाउंडेशन च्या वतीने देण्यात येणाऱ्या सायबर सुरक्षा पुरस्कारात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पुण्यात झालेल्या एका समारंभात या पुरस्कारांचे वितरण झाले.

    क्विक हेल फाउंडेशन आणि विद्यापीठातील संगणक शास्त्र प्रशाळा यांच्यात सामंजस्य करार झाला असून या करारान्वये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रशाळेच्या ३८ विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेच्या बाबतीत जनजागृती केली. जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील जवळपास १०० शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन ४० हजार विद्यार्थ्यांमध्ये आणि दहा हजार सामान्य नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेचे प्रबोधन करण्यात आले.
    सायबर सुरक्षेचे प्रबोधन करण्यात आल्याबद्दल सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा अवार्ड २०२४ चे आयोजन १० फेब्रुवारी रोजी पुणे येथे करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये विद्यापीठाच्या संगणकशास्त्र प्रशाळेला विविध पुरस्कार देण्यात आले.
    कुणीका खैरनार, दर्शना हिरे या विद्यार्थिनींना बेस्ट प्रोसेस कॉम्प्लिअन्स हा अवॉर्ड देण्यात आला तसेच गायत्री ठाकरे , श्रेया भोंबे या विद्यार्थिनींना बेस्ट प्रोग्राम आऊटरिच इम्पॅक्ट हा अवॉर्ड देण्यात आला. प्रशाळेतील प्रा. राजू आमले, प्रा. सुरेंद्र कापसे व प्रा.मनोज पाटील यांना बेस्ट प्रोसेस कॉम्पियन्स हा अवॉर्ड देण्यात आला. संगणकशास्त्र प्रशाला आणि विद्यापीठाला बेस्ट मीडिया अँड आऊटरिच हा अवॉर्ड देण्यात आला. या कार्यक्रमास कुलगुरू प्रा.व्ही एल माहेश्वरी, क्विक हेलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनुपमा काटकर, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवार, सायबर सेलचे पोलिस अधीक्षक संजय शिंत्रे आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Chalisgaon:ऑनलाईन फसवणूक: शेतकऱ्याचे बँक खाते हॅक, ५.५ लाख रुपयांची लंपास

    March 18, 2026

    Bhusawal:खडका चौक परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य

    March 18, 2026

    Pachora:स्टॅम्प पेपर घोटाळा उघड; ५०० रुपयांच्या ‘जादा’ मागणीने वेंडर एसीबीच्या जाळ्यात

    March 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.