साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव तालुका तेली समाजाच्यावतीने समाज भूषण माजी नगराध्यक्ष कै.अण्णासाहेब मधुकर उखा चौधरी यांना नुकतेच ‘मरणोत्तर समाजरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा पुरस्कार नुकताच कॅनडा जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक विजेते, ट्रिपल महाराष्ट्र केसरी तथा अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे (डीवायएसपी) पै.विजय नथ्थू चौधरी यांच्या हस्ते कै. अण्णासाहेब मधुकर चौधरी यांचे लहान बंधु बापू शेठ आणि बाळासाहेब उखा चौधरी यांनी स्वीकारला. याप्रसंगी चाळीसगाव तालुका व चाळीसगाव शहर तेली समाज संघटना अध्यक्ष, सचिव, सर्व पदाधिकारी तसेच तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते.
