साईमत, जळगाव : प्रतिनिधी
शहरातील कोल्हेनगरातील रहिवाशी तथा माजी नगरसेवक विजय पंडितराव कोल्हे यांचे गुरुवारी, ५ ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने रूग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६९ वर्ष होते. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी, ६ ऑक्टोबर रोजी त्यांच्या निवासस्थानापासून दुपारी १ वाजता निघणार आहे. त्यांच्या पार्थिवावर नेरी नाका येथील वैकुंठधामात अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, एक मुलगा, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते माजी महापौर ललित कोल्हे यांचे वडील होत.