नॅशनल गेम्स-२०२३ स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या तीघांची निवड

0
52

साईमत जळगाव प्रतिनिधी

गोवा येथे मनोहर पर्रीकर इनडोर स्टेडियम ३७ व्या नॅशनल गेम्स् स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. यात बास्केटबॉल या खेळाच्या स्पर्धेसाठी ५×५ या क्रीडा प्रकारात जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे बास्केटबॉल प्रशिक्षक वाल्मिक पाटील (हटकर), धनदाई माता महाविद्यालय अमळनेर ची विद्यार्थीनी मनिषा हटकर तसेच ३×३ या क्रीडा प्रकारात मुळजी जेठा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाची विद्यार्थिनी व जैन स्पोर्ट्स अकॅडमीची खेळाडू सोनल हटकर अशा तिघांची या खेळासाठी पंच व तांत्रिक अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीही यांची विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पंच व तांत्रिक अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली होती.

वाल्मिक पाटील, मनिषा हटकर व सोनल हटकर यांच्या नियुक्तीचे पत्र जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड चे अध्यक्ष अशोक जैन यांना बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव कुलविंदरसिह गिल यांच्या वतीने देण्यात आले. वाल्मिक , मनिषा व सोनल यांच्या नियुक्ती बद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जैन स्पोर्टस अकॅडमीचे अध्यक्ष अतुल जैन, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, जैन स्पोर्ट्स चे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, फारूक शेख, रवींद्र धर्माधिकारी, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य एल.बी. देशमुख, क्रीडा शिक्षक सुभाष वानखेडे, मुळजी जेठा शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे, क्रीडा शिक्षक श्रीकृष्ण बेलोरकर, निलेश जोशी, प्रवीण कोल्हे, रणजीत पाटील, धनदाई माता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, क्रीडा संचालक डॉ.शैलेश पाटील, वाय.सी.एम चे समन्वयक डॉ. किशोर पाटील जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल संघटना व सर्व क्रीडाप्रेमींनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here