साईमत जळगाव प्रतिनिधी
येथील डोहोळे परिवारातर्फे नाशिक येथील सप्तशृंगी गडावरील देवीला दर वर्षीप्रमाणे या वर्षीही मकर संक्रांत पर्व काळात अनघा अजय डोहोळे यांनी तयार केलेल्या हलव्याच्या अलंकाराची सेवा अर्पण करण्यात आली .
या वर्षी प्रथमच पारंपरिक दागिन्यामध्ये देवीला घालण्यात येणाऱ्या सोन्याचा पुतळा हार याची हलव्याच्या पुतळा हार तयार करून प्रतिकृती बनवण्यात आली.याची उंची अडीच फूट होती व भव्य असा ८ फुटाचा पद्म हार बनविण्यात आला. त्याच बरोबर तीन फुटाचे ठसठशीत असे हलव्याचे मंगळसूत्र बनविले होते. अडीच फुटाचा कंबरपट्टा. असे भव्य अलंकार बनवून देवीला अर्पण केले. यावेळी अरुण जोशी, जयश्री जोशी, उषा डोहोळे, शेखर डोहोळे यांची उपस्थिती होती.