वरणगावातील खाटीक समाजाने प्रथमच रचला आदर्श पायंडा

0
28

साखरपुड्यातच आटोपला विवाह सोहळा, समाज बांधवांनी पुढाकार घेण्याचे आवाहन

साईमत/वरणगाव/प्रतिनिधी

शहरातील गंगाराम प्लॉट भागातील रहिवासी हाजी मुस्ताक शेख इसहाक यांच्या परिवारातील मुलीचा मंगळवारी साखरपुड्याचे नियोजन केले होते. मात्र, यावेळी समाजातील उपस्थित पदाधिकारी मंडळी यांनी दिवसेंदिवस वाढत असलेली महागाई व इतर अनिष्ठ प्रथांना फाटा देत साखरपुड्यातच विवाह सोहळा आटोपून घेतला. त्यामुळे वरणगाव शहरात प्रथमच खाटीक समाजाने एक आदर्श पाऊल उचलत एक नवीन पायंडा रचल्याने वधू आणि वर पक्षाकडील मंडळीचे कौतुक केले जात आहे.

वरणगाव शहराच्या गंगाराम कॉलनी भागातील रहिवासी हाजी मुस्ताक शेख इसहाक, हाजी अखलाख शेख इसहाक, हाजी इकबाल शेख मुसा, हाजी शफी शेख मुसा यांच्या परिवारातील मुलीचा मंगळवारी जळगाव येथील शेख अरबाज शेख मोजीम, शेख मोजीम शेख इब्राहीम, शेख शमीम शेख इब्राहीम, शेख राजु शेख इब्राहिम, शेख अकील इब्राहीम या परिवारातील मुलाशी साखरपुड्याचे नियोजन केले होते. त्या अनुषंगाने साखरपुड्याची तयारी झाली होती. मात्र, यावेळी उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते जाफर अली मकसुद अली (उर्फ हिप्पी सेठ), शेख अमजद हाजी सगीर (खाटीक बिरादरी अध्यक्ष), हारून शेख गनी (भुसावळ), हाजी शकील हाजी सईद (जळगाव) यांनी पुढाकार घेऊन साखरपुड्याच्या कार्यक्रमातच विवाह सोहळा पार पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नाला यश येवून साखरपुड्याच्या सोहळ्यातच विवाह सोहळा साध्या पद्धतीने मोजक्याच नातेवाईक व मित्र मंडळीच्या उपस्थित पार पडला.

वरणगाव शहराच्या खाटीक बिरादरीत प्रथमच असा आदर्श विवाह सोहळा पार पडल्याने वधू आणि वर पक्षाच्या कुटुंबियांचे सर्व समाज बांधवाकडून कौतुक होत आहे. यावेळी शे. गफ्फार शे. इसहाक, शे. मुख्तार शेख इसहाक, शेख इस्माईल शेख इसहाक, शेख सुभान हाजी अखलाख, शेख नवाब शेख इकबाल, शेख इरफान शेख हाजी मुस्ताक, हाजी युनुस शेख दाऊद, हाजी शरीफ शेख बाबु यांची उपस्थिती होती.

समाजाने आदर्श घ्यावा

सद्यस्थितीत वाढत असलेली महागाई तसेच विवाह सोहळ्यासाठी नातेवाईक व मित्र मंडळीचा वाया जाणारा वेळ तसेच नाहकचा खर्च टाळण्यासाठी सर्व समाज बांधवांनी आदर्श सोहळ्याचे नियोजन करावे, असे आवाहन समाजाचे सामाजिक पदाधिकारी, वधू-वर पक्षाच्यावतीने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here