साईमत जळगाव प्रतिनिधी
येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट सदस्य व नेत्ररोग तज्ञ डॉ. दर्शना पंकज शाह यांची रोटरी मेडिकल मिशन अंतर्गत काश्मीर येथे होणाऱ्या मेगा सर्जिकल प्रोजेक्टसाठी निवड झाली आहे.
काश्मीरचे राज्यपाल लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या पुढाकाराने काश्मीर सरकार व रोटरी यांच्या संयुक्त विद्यमाने या सर्व शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहे. 3 ते 13 सप्टेंबर असे दहा दिवस हे शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे. गतवर्षी नऊ दिवसात 2499 शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या होत्या. डॉ. दर्शना शाह यांचे पती रोटरी जळगाव इलाईटचे माजी अध्यक्ष डॉ. पंकज शाह यांनी देखील रोटरी मेडिकल मिशन मध्ये विदेशात जाऊन मोफत शस्त्रक्रिया करीत सेवा दिली आहे. मु.जे. महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. व्ही बी शाह यांच्या डॉ. दर्शना स्नुषा आहेत. त्यांच्या सेवाकार्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.