साईमत जळगाव प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद जळगाव व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हा क्रीडा संघातर्फे घेण्यात आलेल्या १९ वर्ष मनपा क्षेत्र शालेय खो – खो स्पर्धेत सिद्धिविनायक कनिष्ठ महाविद्यालयाने आर. आर. विद्यालयावर चुरशीने खेळल्या गेलेल्या सामन्यात विजय संपादन करून नाशिक विभागीय आट्यापाट्या स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.
विद्यालयातील खेळाडूंनी मिळविलेल्या यशासाठी संस्था अध्यक्ष माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार लताताई सोनवणे, संचालिका डॉ. अमृता सोनवणे, मुख्याध्यापक आर.पी.खोडपे, गुलाबराव पाटील, शिक्षक पालक संघाच्या छाया फिरके, सुनीता खोंडे आदींनी अभिनंदन करत विभागीय खो-खो स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विजयी संघास विद्यालयाचे क्रीडाशिक्षक अनिल माकडे यांचे मार्गदर्शन लाभले.
विजयी संघात चैतन्य पोळ (कर्णधार) ,क्रिष्णा वाणी, राजेश गव्हाणे, सोनल पाटील, तेजस पाटील, पवन गव्हाणे, शुभम तेलंग, विवेक पाटील, साई वाणी, शुभम चव्हाण, दीपक मोरे, कुणाल तिजारे, दुर्गेश महाजन, भाग्येश पाटील, कुलदीप कोळी आदी खेळाडूंचा समावेश होता.