लायन्स क्लब, मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे अन्नदान

0
50

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

येथील लायन्स क्लब अमळनेर व मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे राजेश पन्नालाल जैन यांच्या सहकार्याने नुकतेच अन्नदान करण्यात आले. अन्नदानाचा सुमारे नऊशे भाविकांनी मंगळग्रह मंदिर येथे लाभ घेतला. कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन डिगंबर महाले, एम.जे.एफ विनोद अग्रवाल होते. यावेळी राजेश जैन यांचे लायन्स क्लबचे अध्यक्ष दिलीप गांधी यांच्यासह सर्व सभासदांनी आभार मानले. कार्यक्रमात क्लबचे सचिव दिनेश मणियार, डॉ.रवींद्र जैन, प्रदीप जैन, उदय शाह, विनोद अग्रवाल, जितेंद्र जैन, अजय हिंदुजा, जितेंद्र पारख, अनिल रायसोनी, प्रशांत सिंघवी, हरिकृष्ण सोनी, राजू नांढा उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here