B.U.N. Raisoni School in Premnagar : प्रेमनगरातील बी.यू.एन. रायसोनी स्कूलच्या विद्यार्थ्यांवर पुष्पवर्षाव

0
18

पहिल्याच दिवशीच विद्यार्थ्यांनी लावली शाळेत हजेरी

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

शहरातील प्रेमनगरातील बी.यू.एन. रायसोनी स्कूल (सी.बी.एस.ई.पॅटर्न) येथे शाळेच्या पहिल्या दिनानिमीत्त शाळेत ‘प्रवेशोत्सव’ उत्साहात साजरा करण्यात आला. उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टयानंतर पुन्हा शाळेत परततांना विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह होता. प्रथम दिवशीच मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली.

शाळेच्या शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे पुष्पवर्षाव करुन स्वागत केले. प्रथम दिनानिमित्त शाळेत उत्तम अशी सजावट केली होती. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मनोज शिरोळे यांनी मुलांचे स्वागत करुन त्यांचे औक्षण केले. तसेच शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी, उपाध्यक्ष उमेद रायसोनी यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here