मुक्ताईनगर शहर संत नगरीमध्ये अवैध धंद्यांचा महापूर ; काय तो मटका, काय तो जुगार, काय ती दारू, काय तो गुटखा, एकदम ओक मध्ये ….

0
34
 काय मटक्याच्या टपऱ्या,काय दारूचे अड्डे, काय करोड रु जुगारची अड्डे, काय लाखोचा गुटखा कस एकदम ओके मध्ये कस खोके देऊन जोरात चालू आहे राजकीय वरदहस्त की प्रशासनाचे दुर्लक्ष तर नाही ना पोलीस प्रशासनाकडून कारवाईस विलंब का ?
साईमत लाईव्ह मुक्ताईनगर प्रतिनिधी 
मुक्ताईनगर शहरांमध्ये जवळच असलेल्या परिवर्तन चौकाच्या लागून काही हात गाड्यांमध्ये खुलेआम मटका घेतला जात आहे लाखो करोडो रुपयांची उलाढाल या माध्यमातून होताना दिसून येत आहे सट्टा मटका हा रोज हा साधारण वर्ग व अ साधारण वर्ग प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या भ्रमणधणी द्वारे किंवा चिठ्ठ्यांद्वारे खेळला जात आहे साधारणतः परिवर्तन चौका लागत असलेल्या रोहिदास नगर पासून ते बजरंग टी जवळून गावंडे कॉम्प्लेक्स च्या समोरील बाजूस व डॉक्टर विवेक सोनवणे यांच्या दवाखान्यालगत असलेल्या खत्री गल्लीमध्ये हा खेळ जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे त्यातच व बऱ्याच ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जवळ एसटी डेपोच्या लाईनने व बस स्टँडच्या भिंतीला लागून सुद्धा सटका मटका जोरात खेळला जात असतो बस स्टँडवरील शाळकरी मुले सुद्धा याकडे वळताना दिसून येत आहे यांचे भविष्य सुद्धा अंधारात येताना दिसत आहे मटका मशिनी द्वारे लावण्याचे देखील चर्चा होत आहे काही राजकीय नेत्यांची पदाधिकारी यांची सुद्धा पार्टनरशिप असल्याचे बोलले जात आहे म्हणून तर प्रशासनातर्फे कारवाई चे दुर्लक्ष तर केले जात नसेल ना अशी सुद्धा शंका धनगर वासियांना पडली आहे.
मुक्ताईनगर शहरामध्ये व्यवसाय ची दुकाने कमी मात्र सत्या पट्ट्यांची दुकाने जास्त असल्याची देखील चर्चा होत आहे नगरपंचायत देखील रोज यावर कर वसुली करत असून नेमका त्याचा व्यवसाय कशाचा यावर देखील नगरपंचायत कुठलीच विचारपूस करताना दिसून येत नाही यात देखील नागरिकांना शंका निर्माण होताना दिसून येते.
खुल्या चौकालगत मटका खेळला जातो मात्र प्रशासनाचे यावर दुर्लक्ष का होत आहे कारवाईला विलंब का होताना दिसून येत असून पाहून सुद्धा न पाहिल्यासारखे प्रशासन का करत आहे असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला असून चर्चा होताना दिसून येत आहे कुठलाही कार्यक्रम परिवर्तन चौकात मोठ्या प्रमाणात होत असून त्या ठिकाणी महामानवाचे चबुतरे असताना देखील देखील पोलीस प्रशासन ताफ्याने जमा होत असते परंतु हा असा प्रकार नजरेस पडताना दिसून येत नसेल का? यावर शंका निर्माण होते मुक्ताईनगर शहरांमध्ये नागरिकांना मजुरी तर नाही मात्र अवैध धंद्यांमध्ये पैसा कमवलेला पैसा रोजचा सायंकाळच्या सुमारास लालची पोटी सत्या पत्त्यांमध्ये लावला जात असून घरी रिकामे हात जावे लागत आह अशा कारणामुळे कित्येक सुखी संसारात विष कालवल्याचे दिसून येत असून संसार विस्कळीत होऊन कित्येक संसार यामुळे उध्वस्त झाले आहे यावर प्रशासन काही करणार का राजकीय लोकप्रतिनिधींनी यावर लक्ष देऊन अवैध धंदे बंद करून कुटुंब वाचवण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे एवढे जर खुलेआम सट्टा चालू असला तर स्थानिक पोलिस प्रशासन करतात तरी काय यात आर्थिक हितसंबंध तर जोपासला जात नाही ना असाही प्रश्न स्थानिक जागरूक नागरिक उपस्तीत करून नागरिक चर्चा करत आहे जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यावर करावी करणार का की नाशिक विभागाचे आय जी साहेब यांचं लक्ष द्यावे लागेल अशी शंका निर्माण होत आहे.
चौकट
कारवाई होणार हे आधीच पोलीस प्रशासन सट्टा व व्यवसायिक यांना सुचना करुन सांगतात अशी गोपनीय माहिती नेमकी कोण सांगत आहे नेमका ते हप्तेखोर पोलीस कोण असा प्रश्न नागरिकांना पडला आहे थातुरमातुर कारवाई होते व शंभर दिडशे रुपयाचा मुद्देमाल मिळतो. किंग याला पकडले पाहिजे मुळावरच घाव का घालत नाही आहे पोलीस प्रशासन अशी जोरदार चर्चा नागरिक करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here