पाच वर्षाची चिमुकली कश्‍पीयाने केले रमजान महिन्याचे संपूर्ण रोजे

0
25

साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर

येथील नुरानी मशिदचे इमाम मौलाना शेख सफार यांची कन्या कश्‍पीया शेख सफार. तिचे वय अवघे पाच वर्षाचे… तरी तिने रोज सकाळी उठून ५ वाजेपर्यंत सहेरी करत भक्तीभावाने नमाज अदा करून सायंकाळी सूर्यास्तापर्यंत तिने ना अन्न मागितले, ना पाणी. तब्बल तेरा तासांहून अधिक काळ तिने निर्जली २९ रोजे ठेवले. सूर्यास्तानंतर इफ्तारनंतर नमाज अदा केली. इतक्या छोट्या वयात कश्‍पीया हिने ठेवलेल्या संपूर्ण रमजान महिन्यांच्या रोजाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना सुरू आहे. आज एकोणतीस (रोजे) उपवास पूर्ण झाले आहेत. यंदा रमजान ऐन उन्हाळ्यात आल्यामुळे रणरणत्या उन्हात पाण्याचा थेंबही न पिता जवळपास १३ ते १४ तास राहण्याची शक्तीच जणू अल्लाह या दिवसांमध्ये देत असल्याची भावना रोजा करणाऱ्यांमध्ये असते. त्यातून त्यांचा रोजा पूर्ण होतो. अवघे ५ वर्षे २ महिने वय असलेली कश्‍पीया हिने संपूर्ण रमजान महिन्याचे रोजे ठेवले आणि दिवसभर संपूर्ण १४ तास निर्जली राहिली. रमजानचा महिना कधी २९ दिवसांचा तर कधी ३० दिवसांचा असतो. रमजान सुरू होताच मुस्लिम बांधव रोजा सुरू करतात. यावर्षी हा पवित्र महिना १२ मार्चपासून सुरू झाला आहे. रोजाची सुरुवात सकाळी सेहरीने होते आणि त्यानंतर सायंकाळी इफ्तारने रोजा सोडला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here