नाशिक ः प्रतिनिधी
सिनेटची निवडणूक स्थगित झाली कारण मिंधे आणि भाजपा गटाची तयारी नाही. कार्यक्रमात तयार होता तरीही निवडणूक स्थगित झाली.अशा गोष्टी घडणं लोकशाहीसाठी घातक आहे, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्याआधी आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही टीका केली.
निवडणुका स्थगित होणे हे घातक आहे. देशात आपल्या लोकशाही नाहीये असेच समजून आता आपल्याला काम करावं लागणार आहे असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. कर्नाटकात छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला. त्यामागे नेमकं कोण आहे हे तपासून बघावे लागेल असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.
तुम्ही छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात चाललात का? असे विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले, बालेकिल्ला कुणाचाही नसतो. मी तिथल्या तरुणांशी संवाद साधण्यासाठी चाललो आहे. नितीन गडकरीच नाही,अनेक लोक आता हेच सांगत आहेत. आत्ता जे घटनाबाह्य सरकार बसले आहे त्यात दोन पक्ष फोडण्यात आले. एक परिवार फोडला पण जे कॅबिनेट त्यांनी बसवले आहे त्यात भाजपाला काय मिळाले? ज्यांनी २५ ते ३० वर्षे पक्षासाठी दिली आहेत अशांना काहीही मिळालेले नाही. पाच ते सहा जण मंत्री आहेत, बाकी सगळे इंपोर्टेड आहेत आणि दुसऱ्या पक्षातले रिजेक्टेड आहेत असेही आदित्य ठाकरे म्हणाले.भाजपा महाराष्ट्राला मागे नेत आहे अशीही टीका आदित्य ठाकरेंनी केली.