Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»शेतकरी भूमिपुत्र, नागरिकांच्या कल्याणासाठी शेळगाव बॅरेजचे प्रथमच जलपूजन : डॉ.कुंदन फेगडे
    यावल

    शेतकरी भूमिपुत्र, नागरिकांच्या कल्याणासाठी शेळगाव बॅरेजचे प्रथमच जलपूजन : डॉ.कुंदन फेगडे

    saimatBy saimatSeptember 25, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शेतकरी भूमिपुत्र, नागरिकांच्या कल्याणासाठी शेळगाव बॅरेजचे प्रथमच जलपूजन : डॉ.कुंदन फेगडे

    साईमत/यावल/प्रतिनिधी :

    तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत जळगाव, भुसावळ, यावल, चोपडा, तालुक्यातील शेतकरी भूमिपुत्र तसेच नागरिकांच्या कल्याणासाठी असलेल्या शेळगाव बॅरेजचे शेतकऱ्यांसह बुधवारी, २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जलपूजन केले. बॅरेजमध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला. या कल्याणकारी, अमृतमय जलसाठ्याचे सर्वात प्रथम शास्त्रोक्त पद्धतीने पूजन रावेर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत समाजसेवक डॉ.कुंदन सुधाकर फेगडे यांनी केले.

    यावल, रावेर, चोपड्यास फायदा

    शेळगाव बॅरेज सिंचन योजनेंतर्गत यावल व चोपडा तालुक्यातील साकळी, नावरे, विरावली, मेहेलखेडी, कोरपावली, दहिगाव, वाघोदा, चुंचाळे, गिरडगाव, वढोदे, दगडी, बोराडे, शिरसाठ यातील चार हजार ६९९.१३ हेक्टर जमीन तसेच रावेर विधानसभा मतदारसंघातील यावल, सांगवी बु.,चितोड, अट्रावल, सातोद, कोळवद या सहा गावांमधील ४ हजार ४२८.९ हेक्टर जमीन अशी ९ हजार १२८ हेक्टर जमीन लाभान्वित होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या २०१८-१९ बेंचमार्किंग रिपोर्टनुसार शेतकऱ्यांना सुमारे २५ ते ३० कोटी रुपयांचा लाभ होणार आहे. या प्रकल्पामुळे पाणलोटांची भूजल पातळीत वाढ होणे व यावल रावेर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. मोठ्या प्रमाणावर भूजल पुनर्भरण, भूजल व्यवस्थापन केल्यास भूजल पातळीत वाढ होणार आहे. प्रकल्पासाठी माजी खासदार तथा आमदार स्व. हरिभाऊ जावळे यांच्यासह,माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, आ.सौ.लताताई सोनवणे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला आहे.

    शास्त्रोक्त पद्धतीने केले जलपूजन

    रावेर विधानसभा मतदारसंघातील सहा गावे हे सिंचन व औद्योगिक वापरासाठी महत्वपूर्ण ठरणार असल्याने शेतकरी भूमिपुत्र व नागरिकांच्या सर्वतोपरी कल्याण, कायापालटासाठी, जलदेवतेची कृपा राहण्यासाठी रावेर विधानसभा मतदारसंघातील आणि यावल येथील समाजसेवक तसा डॉ.कुंदन फेगडे यांनी प्रथमच शेळगाव बॅरेज प्रकल्पातील जलपूजन शास्त्रोक्त पद्धतीने केले.

    यांची लाभली उपस्थिती

    यावेळी गोपाळसिंग पाटील, उखडू पाटील, हेमराज फेगडे, योगेश चौधरी, अनुराधा परदेशी, रोहिदास सपकाळे, गोपाळ कोळी, अनिल सपकाळे, मोहन सपकाळे, सतिष कोळी, गजानन कोळी, संजय पाटील, नाना कोळी, पुष्पक कोळी, गणेश कोळी, अजय कोळी, रितेश बारी, निलेश सपकाळे, अक्षय पवार, राहुल झांबरे, उज्ज्वल कानडे, कोमल इंगळे, शुभम देशमुख, मनोज बारी यांच्यासह शेतकरी, युवक, नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    “सत्तासंघर्ष थांबला! यावल नगरपरिषद समिती सभापती निवडीत ऐतिहासिक समझोता”

    January 19, 2026

    Yaval : शासनातर्फे देण्यात आलेला देय भत्ता स्वाभिमानी पोलीस अधिकारी

    January 17, 2026

    Yaval : ८ वर्षीय ओमने पार केले अडीच तासांत १७ किमी सागरी अंतर

    January 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.