नियमित होणार पुरुष नसबंदी शिबिर
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील वाकडी प्राथमिक आरोग्य केंद्र सर्वात जुने व लौकिक मिळवलेले आरोग्य केंद्र आहे. वाकडी येथे मदर पीएचसी आहे. परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात बैलगाडीने उपचारासाठी येतात. १९५८ मध्ये केदारशेठ देहाडराय, ग्रामस्थ यांच्या प्रयत्नाने आणि आबाजी नाना पाटील यांच्या सहकार्याने प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना झाली. तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अठ्ठावीस ते तीस जणांचा स्टाफ येथे होता. महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबाबत पूर्वीपासूनच आरोग्य केंद्राचा मोठ्या प्रमाणात लौकिक आहे. यानंतरही वाकडी येथे नियमितपणे पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबिर होणार असल्याचे जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. रमेश धापते यांनी सांगितले.
प्राथमिक आरोग्य केंद्रास डॉ.वाय.एच.शहा, डॉ.जयश्री पाटील, डॉ.गौतम खिल्लारे, डॉ.महेश जाधव, डॉ.मधुकर चौधरी आदी लौकिक असलेले वैद्यकीय अधिकारी लाभले आहेत. प्रथमच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले.
जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ.रमेश धापते यांच्याकडून वैद्यकीय अधिकारी डॉ.दानिश खान यांच्या यांच्यासमवेत चार पुरुषांवर पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली. काही कारणास्तव पत्नीस काही आजार किंवा अशक्तपणा असल्यामुळे तसेच महिलांचे कुटुंब नियोजन ऑपरेशनमध्ये सात दिवस ॲडमिट रहावे लागत असल्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी पुरुषांकडून स्वतः वर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली.
यांचे लाभले सहकार्य
याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी राऊत, डॉ.सागर पाटील, डॉ.दानिश खान, डॉ.किरण पाटील, औषध निर्माण अधिकारी अतुल पाटील, आरोग्य सहाय्यक विक्रम राजपूत, आरोग्य सहाय्यिका सुरेखा गोसावी, शोभा घाटे, आरोग्य सेवक सुनील बोरसे, स्वप्नील महाजन, हेमंत पाटील, मनोज परदेशी, अनिल सोनवणे, अनंत गंगातीरे, विनोद पाटील, परिचर फुलवंती रबळे व वाहन चालक जावेद तडवी यांचे सहकार्य लाभले.