भाजपची पहिली यादी जाहीर

0
29

जिल्ह्यातील पाच उमेदवार घोषित

साईमत / जळगाव / प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत यात जिल्ह्यातील पाच जागांचा समावेश आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये 288 जागांच्या वाटपावर चर्चा चालू आहे. जवळपास सर्वच जागांवरील चर्चा निकाली लागली आहे. असे असताना आता भाजपाने एकूण 99 जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

यात जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर, जामनेर, चाळीसगाव, रावेर, भुसावळ अशा पाच मतदारसंघांचा समावेश आहे.
भाजपच्या यादीत आज जामनेरातून ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन, जळगाव शहरातून विद्यमान आमदार राजूमामा भोळे, भुसावळमधून आमदार संजय सावकारे, चाळीसगावातुन आमदार मंगेश चव्हाण, रावेर-यावलमधून पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे या नावांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here