प्राथमिक शाळा ‘खासगी व्यवस्थापन’मध्ये ठरली पात्र
साईमत।चोपडा।प्रतिनिधी।
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा २ मध्ये जळगाव जिल्हास्तरासाठी चोपडा तालुक्यात येथील पंकज विद्यालय प्राथमिक शाळेने ‘खासगी व्यवस्थापन’ मध्ये शाळा पात्र ठरल्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.महाराष्ट्र शासनाच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना अंतर्गत राज्यभर अभियान राबविण्यात येत आहे. नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अव्वलस्थानी असणारी शाळा म्हणून पंकज प्राथमिक विद्यालयाची ख्याती आहे.
संस्थाध्यक्ष डॉ.सुरेश बोरोले यांच्या प्रेरणेने आणि संचालक पंकज बोरोले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाने शासनाच्या स्तुत्य उपक्रमात सहभाग घेतला. विद्यालयात असणाऱ्या पायाभूत सुविधांसह इतर बाबींचे परीक्षण करून तालुकास्तरावर समितीने प्रथम क्रमांक जाहीर केला आहे.
यांनी केले अभिनंदन
उपक्रमाच्या यशाबद्दल मुख्याध्यापक एम. व्ही.पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक वृंद व कर्मचाऱ्यांनी कार्य केले. विद्यालयाच्या सर्वसमावेशक गुणवत्तेचे सादरीकरण केले. त्यामुळे तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याबद्दल संस्थेतर्फे संस्थाध्यक्ष डॉ.सुरेश बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक पंकज बोरोले, नारायण बोरोले, गोकुळ भोळे, भागवत भारंबे, सचिव अशोक कोल्हे यांनी आणि गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विभाग पं.स.चोपडा यांनी अभिनंदन केले आहे.