गिरडगावात गावठाणमधील रोहित्रावरील शॉर्टसर्किटमुळे आग

0
21

साईमत, यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील बऱ्हाणपूर-अंकलेश्‍वर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या गिरडगाव येथे गावठाणमधील डीपी क्र.७ वर शॉर्टसर्किट झाल्यामुळे रविवारी, ५ मे रोजी दुपारी ११:३० वाजेच्या सुमारास अचानक मोठ्या प्रमाणात आग लागली. गिरडगाव येथील पोलीस पाटील अशोक पाटील यांनी तात्काळ यावल पोलिसांशी संपर्क साधून यावल नगरपालिकेचा अग्निशामक बंब बोलावून आग आटोक्यात आणली. यावेळी यावल पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल मराठे, पोलीस कॉन्स्टेबल भरत कोळी यांनीही घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी सहकार्य करुन शर्तीचे प्रयत्न केले. अग्निशमन बंब घटनास्थळी वेळेवर दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले.

घटनास्थळी एमएसईबीचा स्टॉप तात्काळ दाखल झाला. त्यांनी वीज प्रवाह बंद करून आग आटोक्यात आणण्यासाठी सहकार्य केले. पोलीस पाटील अशोक पाटील यांची समय सुचकता व त्यांनी पोलिसांना तात्काळ भ्रमणध्वनीवरून केलेला संपर्क आणि यावल नगरपालिकेच्या अग्निशामक बंबाला बोलावून आग विझविली. तत्परता आणि समय सुचकता बाळगून आग विझविण्यासाठी प्रयत्न केल्याने गावात व परिसरात पोलीस पाटील अशोक पाटील यांचे कौतुक होत आहे. तसेच यावल नगरपरिषदेचे फायरमन कल्पेश बारी आणि अग्निशामक बंबचे ड्रायव्हर शिवाजी पवार यांचेही कौतुक होत आहे.

वेळेवर अग्निशमन बंब आला नसता तर लागलेली आग शेत-शिवारापर्यंत पोहचली असती. बाजूला शेतामध्ये मका चाऱ्यांचा गुंड लावलेला होता. तो जळून खाक झाला असता. मात्र अग्निशामक बंब वेळेवर आल्यामुळे चारा वाचला आहे. सुदैवाने, पुढील अनर्थ टळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here