५० हजारासह संसारोपयोगी वस्तू खाक
साईमत/धरणगाव/प्रतिनिधी :
तालुक्यातील चावलखेडे येथील शोभाबाई दिलीप अहिरे यांच्या बेघर वस्तीतील झोपडीला अचानक आग लागल्याने आगीत ५० हजार रुपयांसह संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाले आहे.
गेल्या ३० ते ४० वर्षांपासून पार्टिशनच्या कच्च्या झोपडीत राहणाऱ्या शोभाबाई अहिरे यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य आणि कष्टाने जमवलेले रोख ५० हजार रुपये या आगीत जळून खाक झाले आहेत. त्यांना बचत गटातून ७० हजार रुपयांचे कर्ज मिळाले होते, त्यातील २० हजार रुपये खर्च झाले होते आणि उर्वरित ५० हजार रुपये घरात ठेवलेले होते, जे जळून गेले. शोभाबाई या मोलमजुरी करून आपली गुजराण करतात. त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे.
