Dr. Shyama Mukherjee Park : …अखेर डॉ.श्यामा मुखर्जी उद्यानातील मांजात अडकलेल्या बगळ्याला मिळाले ‘जीवदान’

0
14

पर्यावरण, पक्षप्रेमींकडून बगळ्याला वाचविणाऱ्यांचे कौतुक

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

शहरातील टॉवर चौकजवळील डॉ.श्यामा मुखर्जी उद्यानात शुक्रवारी, १ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास झाडावर एक बगळा मांजात अडकला होता. याविषयीची माहिती निलेश पाटील यांनी लागलीच वन्यजीव संरक्षण संस्थेचे सचिव योगेश गालफाडे यांना भ्रमणध्वनीवरुन दिली. त्यांनी वेळ न दवडता तात्काळ घटनास्थळी जाऊन बगळ्याची मांज्याच्या तावडीतून सुटका करुन त्याला ‘जीवदान’ दिले आहे.

घटनेची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी श्री.गालफाडे आणि मयूर वाघुळदे यांनी जाऊन पाहणी केली. तेव्हा जवळजवळ ७० फुट उंच झाडावर बगळा पक्षी मांजात अडकल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी तातडीने महानगरपालिकेचे अग्निशमक वाहन बोलावून तिच्या शिडीवर मनपाचे अग्निशमन कर्मचारी अश्वजीत, योगेश गालफडे, मयूर वाघूळदे यांनी सर्वप्रथम बगळ्यास खाली उतरवून बगळ्यात अडकलेला मांजा तातडीने काढला. त्यानंतर त्याला पाणी पाजले. त्याच्यावर प्राथमिक उपचारही केले. त्यानंतर मांजात अडकलेल्या बगळ्याने सुखरूपपणे निसर्गात झेप घेतली. त्यामुळे पर्यावरण, पक्षप्रेमींकडून बगळ्याला वाचविणाऱ्यांचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here