साईमत, नाशिक ः प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणात १५ लाख रुपयांची लाच घेताना नाशिक तहसीलदार नरेशकुमार बहिरम यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. या नंतर जिल्हाभरात खळबळ उडाली. अनेक नागरिकांनी रोष व्यक्त करत या प्रकरणाची गंभीर दाखल घेण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी देखील गंभीर दखल घेत चौकशीसाठी पाच अधिकाऱ्याचे पथक नेमले होते. शिवाय निलंबनाचा प्रस्ताव देखील शासनाकडे पाठवण्यात आला होता. दरम्यान, गुरूवारी रात्री उशिरा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बहिरम यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.