साईमत चोपडा प्रतिनिधी
आदिवासी कोळी समाजाच्या वतीने अमळनेर प्रांताधिकारी कार्यालयांवर सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ बाविस्कर यांनी पुकारलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाचा लढा यशस्वी झाला असून आंदोलनाच्या पाचव्या दिवशी प्रभारी प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने प्रलंबित अनुसूचित जमातीचे ६० जात प्रमाणपत्र देण्यात आले. कोळी समाजाला न्याय दिल्याने सत्याग्रही समाज बांधवांना लिंबू सरबत देवून उपोषणाची सांगता करण्यात आली. या आंदोलनामुळे आता अमळनेर व चोपडा तालुक्यातील शेकडो कोळी समाजबांधवांना टोकरे कोळीचे (एस.टी.) दाखले मिळणार आहेत.
दि. ८ मे पासून अमळनेर येथील प्रांत कार्यालयासमोर आदिवासी टोकरे कोळीचे जातप्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळावे यासाठी चोपडा महर्षी वाल्मिकी समाज मंडळाचे तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर गोरगावलेकर यांनी समाजबांधवांसह अन्नत्याग सत्याग्रह सुरू केलेला होता. सदर आंदोलनाची दखल घेत पाचव्या दिवशी प्रांताधिकारी कैलास कडलक यांच्या हस्ते जगन्नाथ बाविस्कर यांना लिंबू सरबत देवून उपोषण सोडण्यात आले. याप्रसंगी जगन्नाथ बाविस्कर म्हणाले की, मी आणि माझे सहकारी हे समाजबांधवांच्या न्याय हक्कासाठी सतत लढत राहतील. समाजासाठी वाटेल ते करू, जिंकू किंवा मरू या तत्वानुसार हा लढा यशस्वी झाला आहे. यापुढेही समाजबांधवांसाठी असाच लढत राहील, असे महर्षी वाल्मिकी समाज मंडळाचे तालुका संपर्क प्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांनी म्हटले आहे.
याप्रसंगी अॕड. गणेश सोनवणे, माजी पोलीस अधिकारी राजेंद्र रायसिंग, बाळासाहेब सैंदाणे, योगेश बाविस्कर, नामदेव येळवे, गोपाळराव सोनवणे, शुभम सोनवणे, प्रकाश खन्ना, गुलाबराव बाविस्कर, प्रल्हाद कोळी, लखीचंद बाविस्कर, हिलाल सैंदाणे, सुखदेव कोळी, रामचंद्र सपकाळे, कैलास सोनवणे, गोविंदा कोळी, एस. कुमार पेंटर, गोपाळ बाविस्कर, विठ्ठल कोळी, गोपीचंद कोळी, प्रशांत सोनवणे, राकेश कोळी, चंद्रकांत कोळी, वसंत कोळी, मनोज कोळी, मनोहर साळुंखे, पंकज बाविस्कर, विजय सैंदाणे, सागर कोळी, भूषण कोळी, डॉ. भिकन शिरसाट, गणेश कोळी, वैभवराज बाविस्कर, भाऊसाहेब बाविस्कर, समाधान सोनवणे, रामभाऊ बाविस्कर, डॉ. गोकुळ बिर्हाडे, विशालराज बाविस्कर, निर्मला पाटील, आशाबाई बाविस्कर, सावित्रीबाई बाविस्कर, निर्मला बाविस्कर, कस्तुरबाई बाविस्कर आदिंसह इतर समाजबांधव व पदाधिकारी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.