…अखेर लोकवर्गणीतून ऋषीबाबा-लोहारा रस्ता तयार

0
11

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर

येथून जवळील ऋषीबाबांकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली होती. लोहारा गावापासून जवळपास ३ किलोमीटरचा रस्ता गेल्या ५ वर्षांपासून हा रस्ता दुरुस्ती करण्यात यावा, म्हणून लोकप्रतिनिधींना साकडे घालण्यात येत होते. मात्र, गावातील व विकास कामांच्या गप्पा मारणाऱ्या लोकप्रतिनिधीनीही या रस्त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष न दिल्याचे आरोप त्या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे. त्या रस्त्याने पायी चालणे अवघड झाले होते. अखेर शेतकऱ्यांना जाणीव झाली. आपला कोणी वाली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. अखेर सर्व शेतकऱ्यांनी मिळून लोकवर्गणीतून हा रस्ता थोड्याफार प्रमाणात का होईना दुरुस्त केला आहे.

रस्त्याच्या कामासाठी माळी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र माळी, रामा पाटील, गजानन कोळी, तुषार गोंधळे, दादु दुर्गे, अनिल पाटील, भैय्या दुर्गे, सुरेश पाटील, बाळु पाटील, लोटु गोंधळे, गोपाल कोळी, पिंटु दुर्गे, संजु बाविस्कर, मनोज सोनार, योगेश कोळी, संजु कोळी, रवींद्र कोळी यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here