अखेर ठरले… जळगाव शहरातून जयश्री महाजन पेटवणार मशाल

0
32

साईमत / जळगाव / प्रतिनिधी

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील उमेदवारीवरून असणारा तिढा सुटला असून या मतदारसंघातून माजी महापौर जयश्री महाजन यांना शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरेंची मशाल घेऊन त्या विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असताना सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरु केली आहे. मात्र महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याने माविआच्या जळगाव शहर व जळगाव ग्रामीण च्या उमेदवारांबाबत उत्सुकता शिगेला लागली असतांना जळगाव शहरामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून माजी महापौर जयश्री महाजन विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान जळगाव शहर मतदार संघातून भाजपचे विद्यमान आ. राजूमामा भोळे यांचा सामना शिवसेनेच्या माजी महापौर जयश्री महाजन यांच्याशी होणार आहे. मात्र शहरातून काही इच्छूक उमेदवार अपक्ष रिंगणात उतरणार असल्याची चर्चा असून २९ ऑक्टोबर पर्यंत कोणकोण उमेदवारी दाखल करतात तर ४ नोव्हेंबर माघारी पर्यंत कोण रिंगणातून पळ काढतो हे पहाणे उत्सुकतेचे राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here