साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
गेल्या २ वर्षांपासून रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त असलेले प्रमुख वैद्यकीय अधिकारी तसेच इतर सर्व कर्मचारी पदे तात्काळ भरण्यात यावे, यासाठी चाळीसगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत पाटील यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
निवेदन देतांना माजी सरपंच जिभाऊ पाटील, सरपंच प्रमोद चव्हाण तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रमोद खैरनार, अनिल पाटील, रावण वाघ आदी उपस्थित होते. तसेच रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त असलेली सर्वच्या सर्व ८ पदे तात्काळ भरण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.