साईमत, चोपडा : प्रतिनिधी
पाचोरा येथील पत्रकारावर भ्याड हल्ला करणाऱ्या गावगुंडावर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणीचे निवेदन शहर आणि तालुका पत्रकार बांधवांतर्फे तहसीलदार भाऊसाहेब थोरात आणि पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांना निवेदन देण्यात आले. तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
चोपडा तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी एकत्रित येत भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त केला. भ्याड हल्ला करणारे तसेच त्यामागे असणाऱ्या मास्टर माइंडवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा. तसेच पत्रकार संदीप महाजन आणि त्यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदन देतेवेळी शाम जाधव, संजय सोनवणे, अनिल पालीवाल, मिलिंद सोनवणे, प्रवीण पाटील, पंकज पाटील, सुनील पाटील, श्रीकांत नेवे, चंद्रकांत पाटील, उमेश नगराळे, लतीष जैन, संजय बारी, तुषार सूर्यवंशी, सचिन जैस्वाल, विश्वास वाडे, महेश शिरसाठ, हेमकांत गायकवाड, संदीप ओली, मन्सूर तडवी, शुभम माळी, नंदलाल मराठे, मिलिंद वाणी, विनायक पाटील, समाधान कोळी, आत्माराम पाटील, जितेंद्र शिंपी, जगन्नाथ बाविस्कर, शुभम साळूंके यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.