ज्ञानेश महाराव यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा

0
16

श्री स्वामी समर्थ गुरुपीठ भाविकांची मागणी

साईमत/यावल/प्रतिनिधी :

ज्ञानेश महाराव यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर शाखा यावल येथील ४० स्री – पुरुषांसह तरुण भाविकांनी यावल तहसीलदार व यावल पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली. यावल निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद केले आहे की, २२ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या अधिवेनात ज्ञानेश महाराव यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला. भाषणातून आमच्या हिंदू धर्माचे आराध्य दैवत प्रभु श्रीराम तसेच श्री स्वामी समर्थ महाराज व इतर संतांच्या बाबतीत आक्षेपहार्य वक्तव्य केले. त्यामुळे सर्व सखल हिंदू समाज, सर्व सेवेकरी, भाविक नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. इसमाने आपल्या भाषणातून आमच्या अस्मितेची व श्रध्देची टिंगल केलेली दिसून येत आहे. गोष्टींची चित्रफित ही सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित झालेली आहे.

आम्ही सर्व सखल हिंदू धर्माच्यावतीने या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो. ज्ञानेश महाराव यांच्यावर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करावी. तसेच यापुढेही हिंदू धर्माविषयी व हिंदू देवतांच्या तसेच संतांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचे भावना, श्रध्दा दुखित होणारे वक्तव्य करणार नाही. म्हणून ज्ञानेश महाराव यांना अटक करुन कठोर शिक्षा होण्याबाबत कार्यवाही करावी, असे नमूद केले आहे. निवेदनावर यावल शाखेतील सुभाष बोरसे, अरुण गडे, चेतन भंगाळे यांच्यासह ४० स्री – पुरुष तरुण भाविकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here