साईमत, मुंबई ः प्रतिनिधी
विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे. मागील अनेक महिन्यांपासून राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटना या निवडणुकांची आतुरतेने वाट पाहत होते. पण आता या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून सप्टेंबर महिन्यात या निवडणुका होणार आहेत. दरम्यान या निवडणुकांमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध अमित ठाकरे अशी लढत होणार आहे. तर या निवडणुकांसाठी मनसे, िंशदे गट आणि भाजप एकत्र येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सिनेटच्या निवडणुकीवर ज्यांची सत्ता त्यांच्यासोबत मुंबईतली युवाशक्ती असे जवळपास समीकरण तयार झाले असल्याचं म्हटले जात आहे. आतापर्यंत मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद पाहायला मिळाली आहे.