साईमत, जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्हा इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या संचालकपदी मौलाना आझाद अल्पसंख्याक फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष फिरोज शेख यांची निवड करण्यात आली.
गेल्या १३ वर्षात फिरोज शेख यांनी संस्थेच्या माध्यमातून जळगाव शहरात व जिल्ह्याभरात सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, पर्यावरण, आरोग्य तसेच रक्तदान शिबिर या केलेल्या कार्याच्या आधारावर त्यांची निवड करण्यात आली. त्यांना जळगाव जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आयुष प्रसाद यांच्या हस्ते इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या रेडक्रॉस दिनानिमित्त सदस्य प्रमाणपत्र देऊन नुकतेच गौरविण्यात आले.
यावेळी इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन, चेअरमन विनोद बियाणी, सुभाष साखला, लक्ष्मण तिवारी, डॉ. राजेश सुरलकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन उज्ज्वला वर्मा यांनी केले.