विद्यार्थिनींनीच मिळविला प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक
साईमत/यावल/प्रतिनिधी :
येथील नगरपरिषद संचलित पीएमश्री साने गुरुजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. तिन्ही शाखेत विद्यार्थिनींनीच प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला आहे.
नुकत्याच लागलेल्या बारावीच्या निकालात विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांकाने नियती किशोर राणे (८७.५० टक्के), द्वितीय तनवी राकेश कोलते (८७.३३), तृतीय अंजली शरद जोगी (८६ टक्के) गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या.
कॉमर्स शाखेतून प्रथम क्रमांकाने प्रतीक्षा कैलास कोळी (८०.८३ टक्के), द्वितीय ममता रोहिदास महाजन (८०.५०), तृतीय यामिनी नितीन वाघ (७६.५० टक्के) गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या.
कला शाखेतून प्रथम उज्ज्वला रमेश सोनवणे (७५.५० टक्के), द्वितीय भाग्यश्री लक्ष्मण चौधरी (७१.३३), तृतीय रिंकू बाळू भालेराव (६८.५० टक्के) गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. यशस्वी विद्यार्थिनींचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.