स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणाऱ्या वकिलांचा सत्कार

0
5

साईमत, अक्कलकुवा : प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणाऱ्या वकिलांचा सत्कार समारंभ अक्कलकुवा आणि धडगाव वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने तालुक्यातील डाब देवगोई याहा मोगी माता मंदिर परिसरात कार्यक्रम आयोजित केला होता. प्रारंभी याहा मोगी मातेच्या मंदिरात जाऊन माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.एन.एस.शेख होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.राजेंद्र इंदिस, ॲड.जगदीश कुवर, ॲड.आर.आर.मराठे, ॲड.सचिन राणे, ॲड.रवींद्र वसावे, ॲड.संग्राम पाडवी, ॲड.बापु पावरा उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते सहाय्यक अभियोक्ता म्हणून निवड झालेल्या ॲड.ईश्वर वळवी, ॲड.रोहिदास पाडवी, ॲड.पी.आर.ठाकरे, ॲड.गोमता पावरा, ॲड.दिलीप वळवी, ॲड.चेतन वळवी, ॲड. कुवरसिंग वळवी, ॲड.वनिता वळवी, ॲड.लक्ष्मी पावरा आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. एन. एस.शेख, ॲड.राजेंद्र इंदिस, ॲड.जगदीश कुवर, ॲड .आर.आर.मराठे, ॲड. ॲड.सचिन राणे, ॲड.संग्राम पाडवी, ॲड.वसंत वळवी यांनी मनोगत व्यक्त केले. यशस्वीतेसाठी अक्कलकुवा आणि धडगाव वकील संघाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक ॲड.रुपसिंग वसावे, सूत्रसंचालन ॲड.गजमल वसावे तर आभार ॲड.छोटू वळवी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here