Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»पाचोऱ्यात पत्रकार संदीप महाजन यांच्यावर जीवघेणा हल्ला
    क्राईम

    पाचोऱ्यात पत्रकार संदीप महाजन यांच्यावर जीवघेणा हल्ला

    SaimatBy SaimatAugust 10, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, पाचोरा ः प्रतिनिधी

    येथील िंशदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी आपल्यावर जीवघेणा हल्ला केला असल्याचा आरोप पत्रकार संदीप महाजन यांनी केला आहे. यात संदीप महाजन हे जखमी झाले असून किशोर पाटील यांच्याकडून आपणास आणि आपल्या कुटुंबाच्या जिवितास धोका असल्याची तक्रार महाजन यांनी पोलिसात केली आहे.

    पाचोरा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ िंशदे यांनी मुलीच्या कुटुंबीयांशी संवाद साधला होता.  या प्रकरणावर भाष्य करणारे एक वृत्त संदीप महाजन यांनी दिले होते. त्याचा राग धरून किशोर पाटील यांनी पत्रकार महाजन यांना चार दिवसांपुर्वी फोन करून अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली होती. ही क्लीप व्हायरल झाल्यावर आमदारांनी शिविगाळीचे समर्थन देखील केले होते. मात्र तेव्हा संदीप महाजन यांनी समन्वयाची, सामंजस्याची भूमिका घेतली होती. दरम्यान, संदीप महाजन गुरुवारी रेल्व्ो आंदोलनाची बातमी कव्हर करून घरी परतत असताना चार, पाच जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. पाचोरा नगरपालिकेसमोर ज्या चौकात हल्ला झाला तो चौक महाजन यांचे स्वातंत्र्यसैनिक वडिलांच्या नावाने ओळखला जातो. येथेच त्यांना लाथा बुक्कयांनी बेदम मारहाण करण्यात आली. महाजन त्यात गंभीर जखमी झाले आहेत. संदीप महाजन यांनी पोलिसात तक्रार दिली असून किशोर पाटलांनीच आपल्यावर गुंडाकरवी हल्ला केल्याची तक्रारीत म्हटले आहे.

    सत्तेची नशा अशी असते का? आमदार रोहीत पवारांचे ट्वीट
    मुख्यमंत्र्यांसंदर्भातील वृत्त खटकल्याने आमदार किशोर पाटलांनी पत्रकार संदीप महाजन यांना फोनवरून शिवीगाळ केली होती. अशातच आता महाजन यांना काही जणांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या संदर्भात ट्वीट करत रोहित पवार म्हणाले, की पत्रकाराला फोनवर आई-बहिणी वरून शिवीगाळ करायची, मारण्याची धमकी द्यायची, दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची का? विशेष म्हणजे ज्या चौकात मारहाण झाली. त्या चौकाला या पत्रकाराच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचे नाव दिलेले आहे. ही घटना बघून स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या डोळ्यात देखील नक्कीच पाणी आले असेल. मुख्यमंत्री एकनाथ िंशदे साहेब, सत्तेची नशा अशी असते का? लोकशाही मूल्यांना, स्वातंत्र्यासाठी झिजलेल्या कुटुंबांना देखील सन्मान नसतो का? हा प्रश्न आज सर्वसामान्य जनता विचारत आहे. असो, सत्ताधाऱ्यांकडून हीच अपेक्षा आहे. परंतु, एका पत्रकाराला अशा प्रकारे मारहाण झाली असताना महाराष्ट्राच्या पत्रकारांनी साधा निषेध करण्याची िंहमत देखील केली नाही, हे मात्र नक्कीच अनपेक्षित आहे,अशी खंतही रोहित पवार यांनी व्यक्त केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Malegaon : मालेगाव महापालिकेतील लिफ्ट कोसळली

    February 7, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.