Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Muktainagar: हरताळा फाट्यानजीक भीषण अपघात राँग साइडने धावलेल्या कारने पाच मजुरांना उडविले
    क्राईम

    Muktainagar: हरताळा फाट्यानजीक भीषण अपघात राँग साइडने धावलेल्या कारने पाच मजुरांना उडविले

    saimatBy saimatMarch 12, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Muktainagar: Fatal accident near Hartala Phatya, car running on the wrong side, five laborers killed
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    दोन नंबर प्लेटची कार ठरली जीवघेणी पाच जण जखमी

    साईमत/मुक्ताईनगर / प्रतिनिधी

    नागपूर–मुंबई महामार्गावर मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा फाटा परिसरात बुधवारी भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने राँग साइडने आलेल्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाच मजुरांना जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत.

    प्राथमिक माहितीनुसार, जळगावकडून मुक्ताईनगरच्या दिशेने येणारी कार अचानक राँग साइडने आली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मजुरांवर धडकली. या भीषण अपघातात प्रल्हाद काळू पाटील, सलीम शेख, काशीनाथ साळुंखे, मुरली कोळी आणि ज्ञानेश्वर कोळी हे पाच जण जखमी झाले. अपघाताचा मोठा आवाज ऐकून आसपासच्या नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली.

    स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांच्या प्राथमिक तपासणीनुसार दोन जणांची प्रकृती गंभीर असून उर्वरित तिघांना किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या दुखापती झाल्याची माहिती मिळत आहे.

    दरम्यान, अपघात घडल्यानंतर कारमधील चालक घटनास्थळावरून फरार झाल्याने संशय अधिकच गडद झाला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, कारचा वेग अत्यंत जास्त होता आणि धडक इतकी जोरदार होती की वाहनाचा पुढील भाग चुराडा झाला.

    अपघातानंतर कारची तपासणी करताना वाहनावर दोन वेगवेगळ्या नंबर प्लेट लावण्यात आल्याचे आढळून आले. याशिवाय कारमध्ये पोलिसांच्या काठ्या तसेच पोलीस वर्दीही सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे अपघातामागील कारणांबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.

    दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताची नोंद केली असून फरार चालकाचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. तसेच कारवरील नंबर प्लेट व वाहनातील साहित्याच्या आधारे पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Pachora : पाचोर्‍यात वॉटर हिटरचा शॉक फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू

    March 11, 2026

    Jalgaon: जळगावात वडिलांच्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी घरकुल चौकात गोळीबार

    March 11, 2026

    Chalisgaon : चाळीसगावात आरपीएफ जवानाच्या घरात धाडसी चोरी

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.