नाशिक ः प्रतिनिधी
राज्यातील दुष्काळ, पाऊस आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले, “आत्ता पाऊस पडत असला तरी पाऊस पडण्याआधीच ८० टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसान झालेल्या पिकांचे काय? हा मुद्दा महत्त्वाचा आहे. मागील वर्षीही नुकसान झाले, त्याचे पंचनामे झाले. त्यावेळी मी, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे असे सगळेच फिरत होतो.मागील वर्षी अतिवृष्टी झाली,आम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली मात्र, काहीही मदत मिळाली नाही.
पंचनामे होतील, पण पुढे काय?
“यंदाही पाऊस पडायला सुरुवात झाली असली, तरी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे होतील, पण पुढे काय? म्हणून माझा प्रश्न हाच राहील की, उद्या मराठवाड्यात मंत्रीमंडळ बैठक आहे.कदाचित आत भांडणं होतात तशी भांडणं होत राहतील. कारण सरकारमध्ये तीन वेगवेगळे गट एकत्र बसले आहेत.गद्दार गँगही त्यात आहेच,” अशी टीका आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर केली.