पहुरला कारच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू

0
104

गणेश नर्सरीजवळील घटना

साईमत/पहुर, ता.जामनेर/प्रतिनिधी :

शेतातील काम आटोपून दुचाकीने घराकडे येत असताना जळगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील गणेश नर्सरीजवळ कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत ज्ञानेश्वर उर्फ बाळू रामकृष्ण तरवडे (वय ४३, रा.पहुर पेठ) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना सायंकाळी पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यावर मृत घोषित केले. याप्रकरणी ईको वाहनाचे चालक इमरान अलीम पटेल (वय ३१, रा.नांदेड, ता.धरणगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जळगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील गणेश नर्सरीजवळ रस्ता ओलांडत असताना इको कारने (क्र.एमएच-१९ ईजी ४७०१) दुचाकीला मागून धडक दिली. त्यात ज्ञानेश्वर तरवाडे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी पहुर येथील ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी देवेंद्र घोंगडे, संदीप घोंगडे यांच्यासह पहुर पेठचे सरपंच अफजल तडवी, सलीम शेख गनी घटनास्थळी दाखल होऊन तातडीने मदतकार्य केले. अपघातग्रस्त वाहनाने ज्ञानेश्वर तरवाडे यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पहुर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल निकम यांनी तपासणी केल्यानंतर ज्ञानेश्वर यांना मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here