खाजगी वाहनाने पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले
साईमत/पारोळा /प्रतिनिधी :
तालुक्यातील मुंदाणे प्र.अ.येथे एका ४८ वर्षीय शेतकऱ्याचा विहिरीवरील पाण्याची इलेक्ट्रिक मोटर सुरू करताना शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली.अर्जुन नारायण माळी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी अर्जुन माळी हे आपल्या मुंदाणे शिवारातील शेतात गाईंना चारापाणी करून त्यांच्यासाठी पाण्याचे कुंड भरण्यासाठी विहिरीवरील पाण्याची इलेक्ट्रिक मोटर सुरू करण्यासाठी गेले असता शॉक लागून बेशुद्ध पडले.
यावेळी त्यांना भाऊ नामदेव माळी यांनी खाजगी वाहनाने पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत नामदेव माळी यांनी पारोळा पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.