यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील डोंगर कठोरा शिवारात शेतात एका तरूण शेतमजुराने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली आहे . या संदर्भात मिळlलेली माहीती अशी की प्रदीप विजय भंगाळे वय 37 राहणार सांगवी बु॥ तालुका यावल हा डोंगर कठोरा क्षेत्रातील धुळे शिवारातील चेतन प्रकाश पाटील यांच्या शेतात राहुन शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचे उर्दरर्निर्वाह करणाऱ्या तरूणाने आज दि.28जुलै गुरूवार रोजी सकाळी 7वाजेच्या सुमारास त्याचे सोबत कामास असलेले वडील विजय भंगाळे हे त्यास भेटुन घराकडे निघाले असता त्यांने शेतातील पत्र्याच्या शेड खोलीत छताच्या लोखंडी पाईपास रूमाल बांधुन गळफास घेत आत्महत्या केली.त्याच्या सोबत कामास त्याचे वडील व मजुर कामास होते त्याच्या निर्दशनात ही बाब आल्याने त्यांने तात्काळ सदरच्या घटनेची माहिती मयत तरुणाच्या वडिलांना मोबाइलवरुन दिल्यावर सदरची माहीती कळताच मयताचे वडीलांनी अर्ध्या रस्त्यातुन परत शेताकडे धाव घेतली . घटनास्थळावरून गळफास घेतलेल्या प्रदीप विजय भंगाळे याचे मृतदेह खाली उतरवुन यावलच्या ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला.या बाबत घटनेची खबर मयताचे वडील विजय जगन्नाथ भंगाळे यांनी दिल्याने यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.मयत तरूण प्रदीप भंगाळे हा विजय भंगाळे यांचा एकुलता एक मुलगा होता .