निंभोरा पोलीस ठाण्यातील बदली झालेल्या पोलिसांना निरोप

0
21

रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात शांतता

साईमत/निंभोरा,ता.रावेर/प्रतिनिधी: रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक नुकतीच घेण्यात आली. अध्यक्षस्थानी सपोनि हरिदास बोचरे होते. यावेळी प्रगतीशील शेतकरी कडू चौधरी, प्रल्हाद बोंडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष डिगंबर चौधरी, स.पो.नी बोचरे, स्वप्निल पाटील यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीत निंभोरा येथून बदली झालेल्या पोलिसांना निरोप देण्यात आला.

निंभोरा येथे प्रदीर्घकाळ सेवा बजावलेले गोपनीय विभागात कार्यरत पो.ना.का. स्वप्निल पाटील यांची बदली झाल्याने त्यांना भेटवस्तू शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते निरोप देण्यात आला. यावेळी नरेंद्र ढाके,राजीव बोरसे,सुनील कोंडे, काशिनाथ शेलोडे, ज्ञानदेव नेमाडे,राजू भोगे दिलशाद शेख मनोहर तायडे मनोज सोनार दस्तगीर खाटीक गोकुळ भोई,गजानन पाटील, सागर तायडे, विजय सोनार, साहेबराव येवले, मुन्ना पिंजारी, दिलीप सोनवणे, संदीप चौधरी, संतोष काटोले ,राजू पाटील, शेख अकील,किशोर पाटील, प्रशांत सोनवणे, तेजस कोळी ,हेमंत पाटील ,मान्यवर पोलीस होमगार्ड आदी उपस्थित होते. प्रास्ताविक फौजदार रा.का. पाटील, सूत्रसंचालन पो. का.अमोल वाघ तर आभार पो.ना.का.सुरेश पवार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here