रायसोनी महाविद्यालयाच्या ‘गणरायाला’ मिरवणुकीद्वारे निरोप

0
3

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

‘गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…’ अशा जयघोषात असंख्य विद्यार्थी भक्तांच्या उपस्थितीत रंगीबेरंगी फुलांनी, विद्युत रोषणाईने सजलेल्या रथातून जी. एच. रायसोनी इन्स्टीिट्युट ऑफ अभियांत्रिकी व बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील गणरायाला सातव्या दिवशी भावपूर्ण निरोप देण्यात आला.

अभियांत्रिकी इमारतीच्या परिसरात सात दिवसापूर्वी गणरायाची भक्तिभावात प्रतिष्ठापना केली होती. गणेशोत्सवानिमित्त रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जी. एच. रायसोनी इन्स्टीिट्युटचे संचालक प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, ॲकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, जी. एच. रायसोनी कनिष्ठ महविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी, प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आरती झाल्यानंतर बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. सजविलेल्या रथात विराजमान झालेल्या बाप्पाचा रथ महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर आल्यानंतर चोहोबाजूंनी फुलांचा वर्षाव करण्यात आला.

यावेळी जी. एच. रायसोनी इन्स्टीिट्युट ऑफ अभियांत्रिकी व बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाचे तसेच जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांच्या ढोल पथकातील लेझीम आणि झांजपथक नेहमीप्रमाणे मिरवणुकीच्या अग्रस्थानी होते. युवकांसह युवतींचाही तेवढाच समावेश असलेले ध्वज पथक व ताशा पथकांनी वातावरणात चांगलाच रंग भरला होता. मिरवणूक मेहरूण तलाव येथे आल्यावर तेथे आरती करण्यात आली. त्यानंतर गणरायाचा रथ विसर्गस्थळाकडे रवाना झाला. महाविद्यालयीन गणेशोत्सवासाठी जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या ॲचीव्हर्स टीमने सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here