फैजपुरला लम्पी त्वचा रोग, प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर

0
22

फैजपूर, ता.यावल : प्रतिनिधी
जळगाव येथील डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्या वैशाली रोडे, सुजाता खरात, वैष्णवी गुंजकर, सुप्रिया बडे यांनी फैजपूर येथे लम्पी त्वचा रोग आणि प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. यासाठी पशु चिकित्सक डॉ. प्रमोद सुरवाडे (पशुैद्यकीय दवाखाना, फैजपूर) यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिरात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
यावेळी या भागातील अनेक जनावरांची तपासणी कृषी कन्यांनी केली. लम्पी त्वचा रोगाचा संसर्ग किटकांपासून पसरतो. माश्या आणि डास तसेच विशिष्ट प्रजातीच्या उवांमुळे लम्पी आजार पसरतो. या आजाराची लक्षणे लम्पी त्वचा रोग झालेल्या जनावरांमध्ये ताप येणे, चारा न खाणे, त्वचेवर गाठी येणे अशी प्राथमिक लक्षणे दिसून येतात. तसेच डोळे आणि नाकातून स्त्राव येणे, तोंडातून लाळ गळणे, दुध उत्पादन कमी होणे, अशी लक्षणे आढळून येतात. या आजारामुळे जनावरे दगावू नये, यासाठी गोठ्यात माशा, डास होणार नाही याची काळजी घ्यावी. गोठ्यात स्वच्छता राखावी. निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून विभक्त ठेवावे. बाधित जनावरांना चरण्यासाठी बाहेर सोडू नये. याबद्दल शिबिरात माहिती देण्यात आली.
तपासणीवेळी डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सपकाळे, डॉ. शैलेश तायडे, डॉ. अशोक चौधरी, डॉ. एस.एम.पाटील यांनही मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमानंतर परिसरातील जनावरांची तज्ज्ञांनी तपासणी करुन मार्गदर्शन केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here