साईमत लाईव्ह:
रशियातील मॉस्को येथे उभारण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्यापुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील उपस्थित होते. मॉस्कोतील ‘रुडमिनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज स्टडी’ या संस्थेने लोकशाही अण्णा भाऊ साठे यांचा हा पुतळा उभारला आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा मॉस्कोच्या शासकीय वाचनालयात लावला जाणार आहे.
अण्णा भाऊ साठेंचा आम्हाला अभिमान असल्याचे गौरवोद्गगार देवेंद्र फडणवीस यांनी काढले. देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले की, वंचितांचे आवाज असलेले अण्णा भाऊ साठे यांचे भारतीय स्वतंत्रता संग्राम व गोव्याच्या मुक्ती संग्रामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे. रशियाने आज त्यांचा गौरव केल्याने आम्हाला अभिमान वाटत आहे. शिवाय, मला या लोकार्पण सोहळ्याची संधी दिली याबद्दल आभारी आहे.