Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राजकीय»फडणवीसांची केंद्रात एन्ट्री! मोदींनी सोपवली देशभराची जबाबदारी; राजकीय वजन वाढणार
    राजकीय

    फडणवीसांची केंद्रात एन्ट्री! मोदींनी सोपवली देशभराची जबाबदारी; राजकीय वजन वाढणार

    SaimatBy SaimatAugust 17, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह नवी दिल्ली प्रतिनिधी :

    भाजपने संसदीय समिती आणि निवडणूक प्रचार समितीत मोठे उलटफेर केले असून समितीतील नव्या सदस्यांची नावे जाहीर केली आहे. भाजपच्या नव्या निवडणूक प्रचार समितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश करण्यात आला आहे. तर निवडणूक प्रचार समिती आणि संसदीय समितीतून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी  आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान  यांना हटवण्यात आले आहे.

    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा  यांनी आज पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची घोषणा केली. यात देशभरातील भाजपाच्या १५ बड्या नेत्यांच्या समावेश करण्यात आला आहे. समितीच्या अध्यक्षपदी जेपी नड्डा आहेत. तर सदस्यपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, बीएस येडीयुरप्पा, सर्वानंद सोनोवाल, के.लक्ष्मण, इकबाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया, भुपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, ओम माथुर, श्रीमती वनथी श्रीनिवास यांचा समावेश आहे. तर बीएल संतोष हे सचिवपदी असणार आहेत.

    भाजपच्या संसदीय समितीचीही आज घोषणा करण्यात आली. यात बी एस येडीयुरप्पा, सर्वानंद सोनोवाल, के.लक्ष्मण यांचा नव्यानं समावेश करण्यात आला आहे. तर भाजपाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा केंद्रीय संसदीय समितीच्या अध्यक्षपदी असणार आहेत. नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह, बीएस येडीयुरप्पा, सर्वानंद सोनोवाल, के.लक्ष्मण, इकबाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया आणि बीएल संतोष (सचिव) यांचा समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे संसदीय समितीतून यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना हटवण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026

    राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा ठरला उमेदवार; काँग्रेसने शरद पवारांना दिला पाठिंबा

    March 4, 2026

    ‘जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…’ अजितदादांच्या शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांचे अश्रू अनावर; वरळी डोममध्ये भावनांचा पूर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.