साईमत यावल प्रतिनिधी
शासन निर्णयानुसार यावल तालुक्यातील दिव्यांगांना सन 2018 ते 2023 या कालावधीतील 5% निधीसह 50% मालमत्ता करातून सुट, दिव्यांगांना विनाअट घरकुल मंजूर करणे यासह दि.25 जून 2018 च्या परीपत्रकानुसार सर्व सुविधा पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांनी दिल्यानंतर यावल तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने सुरू केलेल्या उपोषणाची सांगता केली.
या प्रसंगी प्रहार जनशक्ती शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश चींधू पाटील, प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, जिल्हा सल्लागार राजमल वाघ, उपजिल्हाध्यक्ष दिनेश सैमिरे, माजी नगराध्यक्ष तुकाराम बारी, अभिमन्यू चौधरी, प्रहार जनशक्ती पक्ष तालुकाध्यक्ष नंदु सोनवणे, सचिन झाल्टे, शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष गोकुल कोळी, माजी नगरसेवक दिलीप वाणी, विजयकुमार गजरे, प्रहार सेवक मनोज करणकर, योगेश कोळी, प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष मोहन सोनार, राहुल सावखेडकर, प्रदीप माळी, ॲड.गोविंदा बारी, जनार्दन फेगडे, उत्तम कानडे, प्रवीण सोनवणे, नदीम खान, दिलीप आमोदकर, सिकंदर पटेल, हेमचंद्र चौधरी, आश्विन चौधरी, दिनकर चौधरी, अमोल बडगुजर, कुणाल फेगडे, ज्ञानदेव कोळी, भास्कर बारी, प्रदीप पाटील, मंगला बारी, फारुख शेख, देविदास गजरे, दिनकर बारी, पूजा देशमुख, सुखलाल धंजे, प्रवीण डांबरे, चूनिलाल अट्रावलकर सागर गजरे, ज्ञानदेव भालेराव, महेंद्र भोई, सय्यद मुश्ताक, देवेश महाले, बिस्मिल्ला खान, अरुण बारी, आदिंसह यावल शहर व तालुक्यातील असंख्य दिव्यांग बांधव व यावल तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी उपोषणामध्ये सहभागी होते. उपस्थितांचे आभार प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, उपजिल्हाध्यक्ष दिनेश सैमीरे व यावल तालुकाध्यक्ष मोहन सोनार यांनी मानले.