Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अमळनेर»अमळनेरातील ग्रंथ प्रदर्शन नोंदणीसाठी २८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
    अमळनेर

    अमळनेरातील ग्रंथ प्रदर्शन नोंदणीसाठी २८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJanuary 16, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

    येथे येत्या २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथ प्रदर्शन नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वितरक, प्रकाशकांच्या मागणीनुसार नोंदणीसाठी २८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. येत्या ३० जानेवारी रोजी सोडत काढण्यात येणार आहे.

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे, वाचक, साहित्यिक आणि ग्रंथ प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांच्या आनंदाचा वार्षिक सोहळा. संमेलनादरम्यान, ग्रंथ, पुस्तके, साहित्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. यासाठी संमेलनस्थळी ग्रंथ दालनासाठी प्रकाशक, ग्रंथ वितरक यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ग्रंथ दालन मागणीचा अर्ज. अटी व शर्ती याबाबतची सविस्तर माहिती संमेलनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच म.वा.मंडळ, अमळनेर कार्यालयातही ग्रंथदालन नोंदणी करता येवू शकते. नोंदणीसाठी २८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी श्‍यामकांत भदाणे ९४२३९०३०४४ यांच्याशी संपर्क साधावा.

    संमेलन सर्व वाचक, साहित्यिक व नागरिकांसाठी खुले आहे. यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. मात्र, ज्यांना निवास व भोजनाची व्यवस्था हवी असल्यास त्यांनी चार हजार रुपये भरुन प्रतिनिधी म्हणून नोंदणी करणे आवश्‍यक आहे. ही व्यवस्था २, ३ व ४ फेब्रुवारी दरम्यान असेल. अधिक माहितीसाठी प्रा.डॉ.पी.बी.बऱ्हाटे ९४२३९३४७९७ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Amalner:चार जणांकडून साईड न दिल्याच्या वादातून व्यापाऱ्याच्या कारची तोडफोड

    February 20, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026

    Amalner : पिळोदे गावात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.