Launch The Website Smoothly : अकरावी प्रवेश प्रक्रियाची मुदत वाढवा ; संकेतस्थळ सुरळीत सुरू करा

0
65

शिवसेनेतर्फे भुसावळला प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन

साईमत/भुसावळ/प्रतिनिधी: 

शासनाने इयत्ता अकरावी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया २६ ते २८ मे दिली आहे. परंतु अर्ज भरण्याची साईट संकेतस्थळ हे वारंवार बंद पडत आहे. एकच दिवस बाकी असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची चिंता वाढली आहे. संबंधित संकेतस्थळ हे सुरळीत सुरू करावे आणि प्रवेश अर्ज प्रकियाची मुदत ही वाढवून द्यावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेतर्फे भुसावळ विभागाचे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना मंगळवारी, २७ रोजी देण्यात आले.

निवेदनात नमूद केले आहे की, शासनाने अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्जाची तारीख २६ ते २८ मे दिली होती. परंतु सोमवारी सकाळपासून अर्ज भरण्याची संबंधित साईट संकेतस्थळ हे वारंवार बंद पडत आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरायचे तरी कसे? त्यातच प्रवेशाची २८ तारीख ही शेवटची मुदत असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची चिंता वाढली आहे. काही विद्यार्थ्यांसह पालकांनी ही बाब शिवसेनेचे भुसावळ विधानसभा प्रमुख संतोष माळी यांच्याकडे मांडली. तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या हिताचा आणि भविष्याचा विचार करून शिवसेनेतर्फे मंगळवारी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांची भेट घेऊन त्यांना दिलेली संकेतस्थळ हे सुरळीत सुरू करा आणि शेवटची २८ तारीखची मुदत वाढ करून देण्यात यावी. कोणत्याही विद्यार्थाचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. अशा सर्व बाबी प्रांताधिकाऱ्यांसमोर मांडल्या. त्याला त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत प्रवेश अर्जाची मुदत वाढवून देण्याची ग्वाही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली.

यांची होती उपस्थिती

निवेदन देतेवेळी भुसावळ विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा प्रभारी तालुकाप्रमुख संतोष माळी, भुसावळ शिवसेना शहर प्रमुख पवन नाले, महिला शिवसेना जिल्हा प्रमुख नंदा निकम, तालुका प्रमुख वर्षा तल्लारे, ज्येष्ठ शिवसैनिक विलास मुळे, सुरेश कोल्हे, अल्पसंख्यांक उपजिल्हा संघटक हमीद शेख, युवक तालुकाप्रमुख राहुल बावणे, दीपक धांडे, प्रकाश निकम, भुसावळ शहर संघटक मयूर सुरवाडे, रुपेश चावरीया, पिंटू भोई, शांताराम बहिरम यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here